भुसावळ तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत ‘या’ तारखेला निघणार !

भुसावळ (6 जुलै 2025) : भुसावळ तालुक्यातील एकूण 39 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत सभा जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी काढण्यात येईल.
त्यानंतर, महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सभा 9 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या सभा तापी सभागृह, उपविभागीय अधिकारी, भुसावळ कार्यालय, भुसावळ येथे पार पडतील.
या आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल.
