यावल शहरात उद्या पेहरन ए-शरीफ उत्सव
डांगपुरा येथुन होणार मिरवणुकीला सुरवात
Pehran-e-Sharif festival tomorrow in Yaval city यावल (9 जुलै 2025) : शहरात गुरुवार, 10 रोजी ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाला सुमारे शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेला हा उत्सव साजरा करतात. त्यात सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे ( पवित्र वस्त्र ) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावतात.
यंदाच्या उत्सवाचे आयोजन बाबुजीपुरा उत्सव समितीने केले आहे. यंदाचा उत्सव हा विना वाद्य साजरा केला जाणार आहे.
यावल शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक ( पवित्र वस्त्र) असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून यावल येथे या पवित्र वस्त्राची सजवलेल्या डोलीतून वाद्याच्या गजरात धार्मिक गीत (नाते पाक) गात मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. तेव्हा गुरूवार, 10 जुलै रोजी यावल शहरात पेहरन शरीफ साजरा केली जात आहे.

शहरातील डांगपुरा येथून सायंकाळी मिरवणुकीला सुरवात होईल. या उत्सवात हिंदू-मुस्लिम सह सर्व धर्मिय बांधव यात सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणुकीत नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची धारणा आहे. जिल्ह्यासह मंबई, मालेगाव, बर्हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक येतात. तेव्हा सांयकाळी साजर्या होणार्या या पेहरन शरीफ च्या यशस्वीते करीता उत्सव समिती अध्यक्ष शेख नईम, उपाध्यक्ष मोहसिन खान, शेख शाहिर, सचिव निसरारूद्दीन, सह सचिव इरफान खान सह सदस्यांच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे तर पेहरन शरीफ मिरवणुकी करीता पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.






