यावल तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर : 50 टक्के महिलांना मिळेल संधी
Reservation announced for 63 Gram Panchayats in Yaval taluka : 50 percent women will get opportunity यावल (10 जुलै 2035) : यावल तालुक्यातील 67 ग्रामपंचायती पैकी 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत मंगळवार, 8 जुलै रोजी मंगळवारी काढण्यात आली. दोन सत्रात जाहिर करण्यात आलेल्या आरक्षणात 50 टक्के जागांवर महिलांना संधी देण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या सभागृहात सदर आरक्षण सोडत कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरीकांसह राजकिय पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यावल तालुक्यात 67 ग्रामपंचायती
ावयावल तालुक्यात एकूण 67 ग्रामपंचायती आहेत. यातील चार ग्रामपंचायती या पेसा क्षेत्र म्हणून घोषीत आहे. जागा अनुसूचित जमातीकरीता आरक्षीत आहे. उर्वरीत 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवार, 8 जुलै रोजी येथील तहसील कार्यालयात दोन सत्रात जाहिर करण्यात आले. सकाळच्या सत्रात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी एकूण 63 ग्रामपंचायतीत आठ जागा अनुसुचित जातीसाठी, 21 जागा अनुसूचित जमातीसाठी तर 17 जागा इतर मागास प्रवर्ग आणी 17 जागा सर्वसाधारण करीता आरक्षण जाहिर केले.


दुपारी दोन वाजेपासून प्रांताधिकारी बबन काकडे यांनी या सर्व 63 ग्रामपंचायतीत विविध प्रवर्गा सह एकुण महिलांसाठीच्या 33 जागेवरील आरक्षण जाहिर केले. प्रक्रियेकरीता निवडणूक नायब तहसीलदार शैलेश तरसोदे, नायब तहसीलदार अतुल गांर्गुडे, सुयोग पाटील यांनी कामकाज पाहिले. विविध आरक्षण संदर्भातील ईश्वर चिठ्ठी मोहंमद अली अन्सार खाटीक या बालीकाच्या हाताने काढण्यात आल्या. सकाळ पासुनचं या आरक्षण सोडत करीता नागरीकांनी तहसिल कार्यालयात गर्दी केली होती.
असे आहे आरक्षण
अनुसुचित जमाती राखीव : बोराळे, वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, पाडळसे, साकळी, हंबर्डी, पिळोदे बुद्रुक, राजोरे
अनुसुचित जामाती महिला राखीव : कोरपावली, म्हैसवाडी, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द, चिखली बुद्रुक, चितोडे
अनुसुचित जाती राखीव :- निमगाव, किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभुर्णी
अनुसुचित जाती महिला राखीव : वनोली, दुसखेडे, न्हावी, अंजाळे
नामाप्र : भालशीव, हिंगोणे, आमोदे, नायगाव, सातोद, कासारखेडा, किनगाव खुर्द, विरावली
नामाप्र महिला राखीव : दहिगाव, भालोद, चुंचाळे, गिरडगाव, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र.सावदा, कोळवद, महेलखेडी
सर्वसाधारण : चिखली खुर्द, चिंचोली, शिरागड, बोरखेडा बुद्रुक, सावखेडेसिम, थोरगव्हाण, पिंपरूड, टाकरखेडे
सर्वसाधारण महिला राखीव : अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, डोणगाव, नावरे, कोळन्हावी, वढोदे प्र.यावल, बोरावल बुद्रुक, आडगाव.






