साकळी ग्रामपंचायतीत मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद
Great response to free eye check-up camp in Sakli Gram Panchayat यावल (10 जुलै 2035) : यावल तालुक्यातील साकळी येथे ग्रामपंचायत साकळी व समता फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरातून शस्त्रक्रियेस पात्र 31 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
76 नागरिकांची तपासणी
साकळी, ता.यावल येथील ग्रामपंचायत साकळी व समता फाऊंडेशन, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने 6 जुलै 2025 रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर सरपंच दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून समता दिव्य ज्योति अभियानास ग्रामपंचायतीत सरपंच दीपक पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.


या शिबिरात 76 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 31 जणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची शस्त्रक्रिया या आठवड्यात करण्यात येणार आहे. आता या पुढे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी नेत्रतपासणी शिबिर ग्रामपंचायतीत घेतले जाणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून साकळी परिसर मोतीबिंदू मुक्त व्हावा हा मुख्य उद्देश आहे. यासाठी साकळी ग्रामपंचायत सर्व प्रकारची मदत करणार आहे. या अभियानाला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य परमानंद बडगुजर, मुकेश बोरसे, विनोद खेवलकर, नरेंद्र मराठे, ग्रा.पं.चे माजी सदस्य साहेबराव बडगुजर, शरद बिराडे सामाजिक कार्यकर्ते योगेश कुंभार, शेख सलीम शे.मजीद, उमेश बडगुजर तसेच समता फाऊंडेशनचे राठोड साहेब आणि नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.
गोर,गरीबांच्या सेवेचा आनंद
आषाढी एकादशीच्या दिवशी योगा-योगाने नेत्रतपासणी शिबिर आयोजनाचे भाग्य मला लाभले.त्यामुळे या नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून ज्या गोर-गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली यातच मला या आज ठिकाणी साक्षात पांडूरंग विठ्ठल भेटल्याची प्रचिती आली असून सेवेतून भक्तीभाव निर्माण झाला, असे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांनी सांगितले.






