भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात गुरुजणांचा सन्मान


Gurus honored at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (10 जुलै 2025) : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी गुरुजणांचा सन्मान केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, ज्येष्ठ शिक्षक सुनील पाठक उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी पलक्षी भंगाळे, प्रगती कांबळे, लावण्या निकम, धानी महाजन, समीक्षा पाटील, कुणिका बेंडाळे, चैतेश सुलोने, यश जोशी, सिद्धेश अत्तरदे, पार्थ चौधरी, योगिनी भिरूड आणि कुणाल चौधरी या सर्व विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्त्व व्यक्त करण्यासाठी भाषण, स्वरचित कविता, कथा अतिशय प्रभावीपणे सादर केल्या.




ज्येष्ठांबद्दल नम्रता बाळगा : मुख्याध्यापक
विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे माता पिता, शिक्षक, ज्येष्ठ मंडळी यांचा सन्मान करण्याचा सल्ला दिला तसेच शिक्षक एस.पी.पाठक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना जीवनात भव्य दिव्य यश प्राप्त करण्यासाठी मेहनत व सर्व ज्येष्ठ व्यक्तींच्याबद्दल मनामध्ये नम्रता असणे किती आवश्यक आहे या संदर्भात मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास विद्यालयातील एस.एम.चिपळूणकर, शैलेंद्र वासकर, एस.पी. महाजन, तेजस्विनी नेमाडे, अर्चना खाचणे आदी शिक्षक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मकरंद नारखेडे यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी रीता महाजन, माधव गरुडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सानिका नेमाडे या विद्यार्थिनीने तर आभार अक्षरा मेघे हिने मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !