देशव्यापी संपास संरक्षण कामगारांचे समर्थन
कर्मचारी एक तास उशीरा कामावर हजर : आंदोलन यशस्वी !
भुसावळ (10 जुलै 2025) : केंद्रीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार सरकारच्या कामगार विरोधी नीतीच्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला. त्याच्या समर्थन म्हणून अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या आदेशानुसार विरोध प्रदर्शन करीत एक तास उशिराने कामावर हजर होऊन संपास समर्थन करण्याचे निर्देश दिले गेले होते.
स्थानिक ऑ फॅ कामगार युनियन तर्फे सकाळी सर्व कामगार रेस्ट शेड येथे 7.30 ते 8.30 वाजेपर्यंत उपस्थिती देऊन सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा विरोध दर्शविला व एक तास कामावर उशिराने हजर झाले. सरकारच्या कामगार विरोधी नीतीच्या विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने केली, युनियनचे महासचिव कॉम दिनेश राजगिरे, अध्यक्ष आशिष मोरे, जेसिएम सदस्य नितीन पाटील यांनी सरकारचे कामगार विरोधी धोरणाबाबत आपले विचार मांडले व कामगारांच्या मागण्यांबाबत विस्तारित माहिती दिली. या प्रसंगी मजदुर युनियन इंटक ने सक्रिय सहभाग नोंदवला.



यांचा लढ्यात सहभाग
युनियनचे कार्याध्यक्ष निलेश देशमुख, गजानन इंगळे, जेसीएम लीडर विनोद धाडे, नितीन देशमुख, योगेश आंबोडकर, किशोर बढे, मजदुर युनियनचे सुजित देवगिरीकर, जितु नेमाडे, विकास दुसाने, एन.बी.भिडे, संतोष बाविस्कर, मिलेश देवराळे, जितु मोरे, आर.एन.जैन, हितेंद्र पाटील, एन.डी.पाटील, पंकज विसपुते, पंकज बडगुजर, बिस्मिल्ला तडवी, महेंद्र इंगळे, तुषार नाईक, संदीप चौधरी, नितीन बी.पाटील, मोहन इंगळे, मंगेश बोडके, हरिचरण बेलकर, राजेंद्र लोखंडे सह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतल्याचे महासिचव दिनेश राजगिरे कळवतात.





