यावलला श्री महर्षी व्यास मंदिरात गुरूपौर्णिमा उत्सव उत्साहात
Guru Purnima festival in full swing at Shri Maharshi Vyas Temple in Yawal यावल (11 जुलै 2025) : यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात गुरू पोर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासोनारायण भगवान की जय !, अशा जयघोषात गुरूवारी संपुर्ण व्यास नगरी दुमदुमली होती. सकाळ पासुन धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरू होते. तर मंदिरात हजारो भाविकांनी दर्शना साठी गर्दी केली होती. परिसरातील विविध गावातून आलेल्या दिंड्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. मंदिराचा गाभारा व समोरील दर्शनीभाग फुलांच्या आरासातून मंदिराचे सौंदर्य खुलून दिसत होते. आलेल्या भाविकांना बुंदी लाडू, सह मसाली भात असा महाप्रसाद वितरण करण्यात आला.
11 क्विंटलची बुंदी व 21 क्विंटल तांदूळाचा मसालेभात वाटप
आषाळशुध्द पोर्णिमा अर्थात गुरू पोर्णिमा निमित्त गुरूवारी यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापुजा करण्यात आली पुजेचा मान स्वप्निल सुरेश फेगडे व रिंकू फेगडे, संतोष गोपाळ पाटील व उर्मिला पाटील, ह्रतीक राजेंद्र महाजन व दीपाशा महाजन या दाम्पत्यास देण्यात आला होता. मंदिरातील संपुर्ण धार्मिक विधी ब्रह्मवृंद महर्षी व्यास मंदिरातील पुजारी बिल्लू महाराज, भुवनदास बैरागी, अतुल महाराज, महेश बयानी, मोरेश्वर बयानी, राजू बयानी, सुनिल जोशी, भूषण कुलकर्णी, हेमंत मुळे, प्रसाद कुलकर्णी, मनीष बैरागी, अथर्व बयानी, निखिल वैद्य, गोपाल बैरागी, अभय नाईक, निशिकांत तांबोळी, हेमांशू बावीसे, भूषण बैरागी या ब्रम्हवृंदानी पार पाडली व नंतर भाविक भक्तांकरीता गाभारा दशर्नाकरीता उघडण्यात आला. आलेल्या भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले येथे 11 क्विंटलची बुंदी व 21 क्विंटल तांदूळाचा तिखट मसाली भाताचा महाप्रसाद काळा हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हजारो भाविकांना वितरित करण्यात आला.








