फसव्या लिंकपासून सावध रहा : के.नारखेडेत एपीआय राहुल भंडारे
भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात सायबर क्राईम विषयी जनजागृती
Awareness campaign about cybercrime at K. Narkhede School in Bhusawal city भुसावळ (11 जुलै 2025) :सोशल मिडीयाचा वापर करताना अनेकदा विविध प्रकारच्या लिंक आपल्याला येतात व या अनोळखी लिंकला क्लिक करताच आपल्या बँक खात्यातून रक्कम कपात होते त्यामुळे कुठल्याही अनोळखी लिंकला क्लीक करू नये, असे आवाहन भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलि निरीक्षक राहुल भंडारे यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर क्राईमवर त्यांनी मार्गदर्शन करीत सतर्क राहण्याचे यावेळी आवाहन केले.
तर आपलीही होवू शकते फसवणूक
भंडारे म्हणाले की, सायबर गुन्हेगार विविध क्लृप्त्या काढून नागरिकांची फसवणूक करतात. अनेकदा कुटूंबातील लोकांना पोलिसांनी पकडल्याचे सांगून पैसेही मागितले जातात, व्हिडिओ कॉलही केला जातो मात्र अशा प्रकारचे फ्रॉड कॉलपासून सावध रहावे तसेच आपली फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहावे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुद्धा उत्तरे दिली व त्यांच्या शंकाचे निरसन केले.








