नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका मात्र भुसावळात प्राथमिक सुविधांची बोंब

शिंदेंच्या गटातील पदाधिकारी आक्रमक : सुविधा न पुरवल्यास आंदोलनाचा इशारा


The only ‘A’ class municipality in Nashik division, but Bhusawal lacks basic facilities. भुसावळ (11 जुलै 2025) : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असतानाही शहरात प्राथमिक सुविधांची बोंब आहे. शहरातील अनेक भागात अद्यापही रस्ते नाहीत, सार्वजनिक शौचालय नाही तर पाणी उशाला असूनही कोरड घशाला असल्याची स्थिती आहे. हे चित्र तातडीने बदलावे अन्यथा तीव्र आंदोनाचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील पदाधिकारी दीपक धांडे व पदाधिकार्‍यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

असा आहे आंदोलकांच्या मागण्या
भुसावळ शहरात एकूण 40 ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत. या सर्व सार्वजनिक शौचालयात गत तीन महिन्यांपासून सफाई कामगार स्वच्छतेसाठी येत नाही व त्यामुळे या ठिकाणी हे सर्व शौचालय घाणीने फुल्ल भरून वाहत आहेत त्यामुळे दुर्गंधीमुळे लहान मुले व नागरिक आजारी पडत आहेत. येत्या दोन दिवसात अर्थात सोमवारपर्यंत या सर्व ठिकाणी सफाई न झाल्यास मंगळवारी घाण टाकण्यात येईल, असा इशारा शिंदे गटातील पदाधिकार्‍यांनी यावेळी दिला.




तर रास्ता रोको आंदोलन
भुसावळातील मरीमाता मंदिर ते नरेंद्र महाजन चौक हा काँक्रिट
रस्ता गेल्या आठ महिन्यांपासून मंजूर आहे. या रस्त्याची टेंडर प्रोसेस देखील झाली आहे. कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आल्यानंतरही कामाचा पत्ता नाही. पालिकेत या कामाचे तीन कोटी रुपये सुद्धा धूळ खात पडून आहेत. येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा जळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आधी पक्के अतिक्रमण हटवा
सध्या पावसाळा सुरू असतानाही पालिकेने अतिक्रमण काढून हातावर पोट भरणार्‍यांच्या पोटावर कुर्‍हाड चालवली आहे वास्तविक शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत व अनधिकृतरित्या बांधकाम काढण्याची पालिकेची जवाबदारी असतानाही दखल घेतली जात नाही त्यामुळे आधी पक्के अतिक्रमण हटवावे व नंतर गरीबांच्या अतिक्रमणाला धक्का लावावा, अशी मागणी करण्यात आली.

शहरात सर्व दूर अस्वच्छता
भुसावळ शहरात स्वच्छतेचा विषय खूपच गंभीर झाला आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

यांची होती उपस्थिती
निवेदन देतान शिंदेच्या शिवसेनेचे दीपक धांडे, दीपक सोनवणे, नरेंद्र लोखंडे, पिंटू भोई, जितू पाटील, योगेश वाघ, भूषण भोई, रवी तायडे, संतोष मेंबर, दिलीप भाई, पिंटू पळशीकर, रोहित वराडे, शांताराम भील व शिवसैनिकांनी दिला आहे.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !