गुरुविण दैवत नाही : भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात


Guruveen is not a god : Guru Purnima is celebrated with enthusiasm at Tapti Public School in Bhusawal भुसावळ (11 जुलै 2025) : भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शसचेळी विद्यार्थ्यांनी विविध ड्रामा सादर केला.

दरवर्षी आषाढी पौर्णिमेनिमित्त स्कुलमध्ये गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य निना कटलर यांनी सरस्वती पूजन व द्वीपप्रज्वलन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरु या नावाचा अर्थ सांगून गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधाकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतात, असे सांगितले.




विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील आई, वडील, शिक्षक या सर्व गुरूंचे महत्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यां-बद्दल सांगून गुरुंबद्दलचा आदर व्यक्त केला. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !