खेळताना जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू : जळगावच्या आर.आर.विद्यालयातील घटना


Class IX student dies after falling to the ground while playing : Incident at Jalgaon’s RR Vidyalaya जळगाव (11 जुलै 2025) : खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील आर.आर.विद्यालयात घडली. कल्पेश वाल्मीक इंगळे (15, रा.कठोरा, जि.बुलढाणा, ह.मु.कासमवाडी, जळगाव) असे मताचे नाव आहे.

काय घडले जळगावात
आई वडील, बहीण आणि लहान भावासोबत वास्तव्यास आलेला कल्पेश हा नेहमीप्रमाणे शुक्रवार, 11 जुलै रोजी सकाळी शाळेत आलेला होता. दुपारी तीन वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणासाठी सुट्टी झाली होती. विद्यार्थ्यांसोबत खेळत असतात तो अचानक जमिनीवर कोसळल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली.






दरम्यान, कल्पेशला शिक्षकांनी उचलून तातडीने जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी कल्पेशच्या आई वडील आणि भाऊ यांनी एकच आक्रोश केला.

मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप
दरम्यान, कल्पेशच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केला. सकाळी गेला तेव्हा तो चांगला होता. दोन दिवसांपूर्वी सुद्धा त्याचा वाद झाल्याने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासण्यात यावे, चौकशी करावी व दोषींवर अटक करून कारवाई करावी त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा पवित्रा मृत कल्पेश याच्या कुटुंबीयांनी घेतला होता. कल्पेशया पश्चात आई-वडील एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !