भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये ‘रेन डे’ उत्साहात
भुसावळ (12 जुलै 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पावसाळ्यातील नुकताच ‘रेन डे’ साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील नर्सरी ते सिनीयर केजीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
यावेळी या विद्यार्थ्यांनी रेनकोट, छत्री घेऊन शाळेत पावसाचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी कागदाच्या नावा बनवल्या होत्या. त्या नावा त्यांनी टपात टाकल्या तसेच बेडूक उड्या मारून व शाळेत टपात ठेवलेल्या पाण्यात उड्या मारून पावसाचा आनंद घेतला व विविध प्रकारची गाणीदेखील म्हटलह. यावेळी प्रिन्सिपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना ‘रेन डे’ बद्दल माहिती सांगितली. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी देखील ‘रेन डे’ चा आनंद घेतला.








