साकेगावातील प्रकाश शेगर यांची एमएसएफमध्ये नियुक्ती
परिस्थितीवर मात करीत मिळवले यश : गावाचा वाढला नावलौकीक
Prakash Shegar from Sakegaon appointed to MSF भुसावळ (12 जुलै 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील गरीब कुटुंबातील प्रकाश अर्जुन शेगर याने अत्यंत गरीब परिस्थितीत दृढ निश्चय व मेहनतीच्या बळावर एमएसएफमध्ये भरती होण्याचे धैर्य गाठले. नुकतीच त्याला शासकीय सेवेत संधी मिळाली आहे.
ग्रामपंचायतीने केला सत्कार
प्रसंगी साकेगावचे माजी प्रभारी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शकील पटेल, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील, साकेगाव ग्रामीण पतसंस्थेचे संचालक विजय बावस्कर, माजी सरपंच विजय पाटील, चंद्रकांत कोलते व ग्रामपंचायत सदस्य धनराज भोई, राजेंद्र भोळे, संतोष पाटील, दीपक चौधरी, डॉ.कैलास ठाकरे, भिवा शेखर व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.








