भुसाावळात अकरावीच्या प्रवेशासाठी नियमित फेरी दोनची प्रकिया सुरू

विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार प्रवेश पूर्ण करावा : 17 जुलैला निकाल जाहीर ;: 18 ते 21 जुलैदरम्यान प्रवेशाची अंतिम संधी


The regular round two process for admission to class 11th has begun in Bhusawal भुसावळ (13 जुलै 2025) : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे इयत्ता 11 वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक दोन सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 10 जुलै ते 13 जुलै 2025 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत आपली नोंदणी व माहिती दुरुस्ती करून प्रवेश प्रकियेत सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

लॉगीनद्वारे प्रवेश शक्य
विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार 1 ते 10 विद्यालयांची पसंती देता येणार असून, नियमित फेरी 1 मध्ये प्रवेश न मिळालेल्यांना प्राधान्यक्रम अद्ययावत करता येणार आहे. प्रवेशासाठी यादी 17 जुलै रोजी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार असून, विद्यार्थ्यांनाद्वारेही माहिती दिली जाईल. यानंतर 18 ते 21 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः लॉगिन करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.




प्रवेशासाठी महत्त्वाचे मुद्दे
विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशाची माहिती लॉगिनद्वारे तपासावी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा, प्रवेश न मिळाल्यास पुढील फेरीत पुनः पसंतीक्रम देता येणार, प्रवेश नाकारण्याची/रद्द करण्याची प्रक्रिया देखील उपलब्ध राहाणार आहे.

कोटांतर्गत प्रवेशासाठी स्वतंत्र वेळापत्रक
संस्थात्मक, व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी 10 ते 13 जुलै दरम्यान नोंदणी व पसंती अर्ज सादर करावा. कोटांतर्गत पात्र विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांच्या लॉगिनमध्ये दिसणार असून, प्रवेशासाठी 23 जुलै रोजी निवड यादीनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क साधून वेळेत प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी आवाहन केल्याचे भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.एम.पाटील यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !