शाळा सुरू असताना शिक्षकांना बीएलओ कामाची सक्ती हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान : प्र.ह.दलाल
Forcing teachers to do BLO work while schools are open is a contempt of the Supreme Court : Pr.H. Dalal भुसावळ (13 जुलै 2025) : नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची सुसंवाद साधून अध्यापनाचे कार्यही सुरू केले आहे. असे असताना शिक्षकांना बीलएओ कामाची सक्ती केली जात असल्याचा प्रकार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी म्हटले आहे.
काय आहे न्यायालयाचे निर्देश
दलाल यांनी दिलेल्या पत्रानुसार, शिक्षकांना विविध प्रपत्रके भरणे, पाठ्यपुस्तकांची वितरण करणे इत्यादी कामेही आहेत. लवकरच प्रथम घटक चाचणी परीक्षा देखील होईल नेमके याच वेळी जिल्ह्यातील अनेक माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बी. एल. ओ. कामे करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी लेखी आदेश दिले आहे त्याबाबत सक्तीही करण्यात येत आहे.



तर अवमान याचिका दाखल करणार
वास्तविकतः शिक्षकांना सदर कामे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 56 59/2007 च्या निर्णयात परिच्छेद क्रमांक 32 मध्ये स्पष्ट आदेश देताना म्हटले आहे की, बीएलओची कामे देणे अनिवार्यच असेल तरते फक्त शाळेला सुटी असेल, अद्यापनचे काम नसेल त्याचवेळी द्यावे. शाळा व अध्यापनाचे काम सुरू असताना, अशी कामे देऊ नये त्याचप्रमाणे संचालक मानव संसाधन मंत्रालय, नवी दिल्ली यांनी 13 सप्टेंबर 2010 अन्वये सर्व शिक्षण सचिवांना दिलेल्या मार्गदर्शन सूचनापत्रात सुद्धा वडील प्रमाणेच आदेश दिलेले आहेत तसेच उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांनीही याचिका क्रमांक 417/2020 च्या निर्णयात देखील वरील प्रमाणेच आदेश दिलेले आहेत. या तीनही बाबींकडे दुर्लक्ष करून आता शाळेला सुट्टी नसताना आणि शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू असताना शिक्षकांना बीएलओ काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारी आहे. याबाबत अधिकार्यांनी पुनर्विचार करावा अन्यथा संघटनेमार्फत अशा अधिकार्यांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दावा दाखल करावा लागेल, असा इशारा शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र.ह.दलाल यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.





