मंत्री सावकारेंविरोधात अपशब्द वापरणार्या डोंबिवलीतील भूषण पाटलाविरोधात आणखी एक गुन्हा
Another case registered against Bhushan Patel of Dombivli for using abusive language against Minister Savkare भुसावळ (15 जुलै 2025) : भुसावळचे आमदार व मंत्री संजय सावकारे यांच्या विषयी तसेच महामानवाविषयी अपशब्द वापरणार्या डोंबिवलीच्या भूषण पाटलाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोन व वरणगावात एक गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा शहर पोलिसात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पत्नी आणि सासू-सासरे यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण
भूषण भास्कर पाटील (रा. डोंबिवली) याने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण पाटील याने 1 ऑक्टोबर 2024 ते 19 नोव्हेबर 2024 या कालावधीत फेसबुक अकाउंटचा वापर करून आपल्या पत्नी आणि सासू-सासर्यांविरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट लिहिल्या होत्या. या प्रकारानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
याआधीही भूषण पाटील हा वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत तसेच वरणगाव पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता हा चौथा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या प्रकरणाचा तपास शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणाचीही बदनामी करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या कृत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
