यावल तालुक्यात खळबळ : वाघाच्या हल्ल्यात म्हशीचा मृत्यू
Excitement in Yaval taluka: Buffalo dies in tiger attack यावल (15 जुलै 2025) : यावल तालुक्यातील पाडळसे व भोरटे परिसरात वाघाचे वास्तव असल्याची बोलले जात आहे. प्रत्यक्ष वाघ आहे का बिबट्या याबाबत मात्र संभ्रम आहे तर मंगळवारी पहाटे भोरटेक गावाजवळ एका गुरांच्या गोठ्यावर वाघाने हल्ला केल्यानंतर म्हशीचा मृत्यू ओढवल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काय घडले नेमके
गेल्या काही दिवसांपासून पाडळसे व आसपासच्या शिवारात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती मात्र वाघ या भागात नसावा बिबट असावा असे वनविभागाचे म्हणणे आहे तर काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचा दावाही केला होता.

दरम्यान, मंगळवारी पहाटे भोरटेक येथील शेतकरी भास्कर रमेश कोळी यांच्या गोठ्यात घुसून वाघाने म्हशीला ठार केले ही घटना उघडकीस आल्या नंतर परिसरातील शेतकरी आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेबाबत चिंतीत झाले आहेत.
या घटनेची माहिती पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वन विभागाला कळविल्याने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वनक्षेत्रपाल यावल पूर्व एस. एम. पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डोंगरकठोरा आय.एस. तडवी, वनपाल फैजपूर अतुल तायडे, वनपाल गस्तीपथक आर. एम. जाधव, वनरक्षक गणेश चौधरी, वनरक्षक आय.बी. चव्हाण, वाहन चालक वाय. डी. तेली घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाकडून पावलांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा केले आहे. तसेच, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
