भुसावळ आगाराला ‘विठ्ठल पावला’ : पंढरपूर यात्रेतून 8.65 लाखांचे विक्रमी उत्पन्न


Bhusawal Agar gets ‘Vitthal Pawla’ : Record income of Rs 8.65 lakh from Pandharpur Yatra भुसावळ (16 जुलै 2025) : आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पंढरपूर यात्रेमुळे भुसावळ आगाराला यंदा विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. केवळ 13 बसेसच्या माध्यमातून तब्बल आठ लाख 65 हजार रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळवत आगाराने आपल्या महसुलात मोठी भर घातली आहे. या यशामुळे आगारात उत्साहाचे वातावरण असून खर्‍या अर्थाने पांडुरंग पावले, अशी प्रतिक्रिया आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी दिली.

14 हजार किलोमीटरचा प्रवास
भुसावल आगाराच्या बस यात्रेनिमित्त 14 हजार 376 किलोमीटरचा प्रवास केला. पंढरपूर यात्रेसाठी भुसावळ आगाराने 13 बसेसची विशेष व्यवस्था केली होती. या बसेसने वारकर्‍यांची ने-आण करत एकूण 14 हजार 376 किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. यातून आगाराला प्रवाशांकडून थेट तीन लाख 64 हजार 924 रुपये रोख उत्पन्न मिळाले. महिला आणि ज्येष्ठांच्या सवलतींमधूनही सुध्दा उत्पन्नात हातभार लागला. शासनाच्या नियमांनुसार 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना तिकिटात देण्यात आलेल्या सवलतींमुळेही आगाराला अप्रत्यक्षपणे मोठे उत्पन्न मिळाले. या सवलतींमुळे अधिक प्रवाशांनी एस.टी.ने प्रवास करणे पसंत केले, ज्यामुळे एकूण प्रवासी संख्या वाढली आणि पर्यायाने उत्पन्नात भर पडली.




चार लाखांचा निव्वळ नफा
चार लाखांहून अधिक निव्वळ नफा यानिमीत्ताने आगाराला मिळाला. एकूण 8 लाख 65 हजार रुपयांच्या उत्पन्नातून डिझेल खर्च, कर्मचारी वेतन आणि इतर परिचालन खर्च 4 लाख 12 हजार 569 वजा जाता आगाराला चार लाख 52 हजार 190 रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. हा खर्च वजा जाताही, भुसावळ आगाराला पंढरपूर यात्रेतून चार लाख 52 हजार 190 लाखांहून अधिकचा निव्वळ नफा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या विक्रमी उत्पन्नामुळे भुसावळ आगाराची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे. आगार व्यवस्थापनाने या यशाचे श्रेय कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमांना आणि वारकर्‍यांच्या एस.टी.वरील विश्वासाला दिले आहे. पुढील काळातही प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक शिवदे यांनी दिले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !