भुसावळातील ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये ‘कॅन्वा’ अ‍ॅप कार्यशाळा


भुसावळ (21 जुलै 2025) : शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये ‘कॅन्वा’ अ‍ॅपविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत व स्मृतीचिन्ह देऊन झाली. मार्गदर्शक कांती जंगले यांनी विद्यार्थ्यांना ‘कॅन्वा’ अ‍ॅपची माहिती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले. इयत्ता पाचवी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.




अ‍ॅपच्या उपयुक्ततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !