महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावल भाजपकडून रक्तदान शिबिर


Blood donation camp यावल (22 जुलै 2025) : शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सदर रक्तदान शिबिर शेतकी संघात उत्साहात पार पडले. या ठिकाणी 128 दात्यांनी रक्तदान केले.

128 दात्यांचे रक्तदान
यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 128 दात्यांनी स्वच्छेने या ठिकाणी येऊन रक्तदान केले.




प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी, उपाध्यक्ष मुकेश कोळी, बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, नितीन महाजन, बबलू घारू, दिनेश क्षीरसागर सह आदींची उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !