अकलूदला घराबाहेर लावलेली चारचाकी महिलेने पेटवली
फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल ; सव्वातीन लाखांचे नुकसान
यावल (22 जुलै 2025) : यावल तालुक्यातील अकलूद गावात एका इसमाने घराबाहेर त्याचे क्रुझर वाहन हे लावले होते. एका महिलेने या वाहनावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. यात संबधिताचे तीन लाख 15 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले अकलूदला
अकलूद गावात अर्जुन पाव्हून तायडे हे इसम राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची क्रुझर चारचाकी (वाहन क्रमांक एम.पी.09 झिरो व्ही. 7108) हे लावले होते. या वाहनावर मनोरमा विकी सपकाळे (भुसावळ) या महिलेने काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. या प्रकाराने वाहनाचे तीन लाख 15 हजारांचे नुकसान झाले.







