भुसावळात पत्रकाराच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
Tree plantation on the occasion of journalist’s birthday in Bhusawal भुसावळ (27 जुलै 2025) : भुसावळ शहरातील आवाज जनतेच्या न्युज चॅनेलचे संपादक कलीम पायलट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक, टिम हिरवांकुरचे जिल्हा अध्यक्ष नाना पाटील सर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
एक वृक्ष माझ्या पत्रकार बंधुसाठी ही संकल्पना राबवण्याचे यावेळी ठरले. यावेळी 15 झाडे लावण्यात आली. यावेळी पत्रकार प्रेम परदेशी, छायाचित्रकार श्याम गोविंदा, मनोहर लोणे, संघर्ष माझा न्युज चॅनेलचे संपादक सुनील आराक, दैनिक महाराष्ट्र सारथीचे नाना पाटील , भाग्यवेद अॅकेडमीचे संचालक निळे, फालक स्पोर्टचे गामोर फालक, ईझी क्वीक सर्विसचे संचालक धांडे आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.


