भुसावळात पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष : 13 रिक्षा चालकांविरूध्द दंडात्मक कारवाई
भुसावळ (27 जुलै 2025) : बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून स्टेशन रोडचे काम सुरू केल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. याच पार्श्वभुमीवर मॉडर्न रोड, सराफ बाजार या भागातून रिक्षा चालकांना जाण्यास प्रशासनाने मनाई केली असतांनाही सूचनांना केराची टोपली दाखविणार्या 13 रिक्षा चालकांविरूध्द शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली. यामुळे रिक्षा चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारवाईने उडाली खळबळ
स्टेशन रोडच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरणाचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. यामुळे हा रस्ता वाहतूकीला बंद केला आहे, यामुळे बसस्थानक, रेल्वे स्थानक येथून प्रवासी घेऊन जात असलेल्या प्रवासी रिक्षा या मॉर्डन रेाड, सराफ बाजार या परिसरातून नेत असलेल्याने वाहतूक ठप्प होत असते, यामुळे या मार्गावरून रिक्षा नेऊ नये अश्या सूचना पोलिसांनी दिलेल्या असतांना सुध्दा काही रिक्षा चालक याच मार्गाने वाहतूक करीत असल्याने अश्या रिक्षा चालकांविरूध्द शहर वाहतूक शाखेने मोहिम राबवित 13 रिक्षा चालकांविरूध्द दंडात्मक कारवाई केली.



सहायक निरीक्षक उमेश महाले, प्रशांत चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली. ही कारवाई नित्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.