भुसावळात बसस्थानक रस्त्याचे काँक्रिटीकरण : ‘या’ भागातील रस्ते ‘वन वे’


भुसावळ (30 जुलै 2025) : भुसावळातील स्टेशन रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतुकीसाठी लोखंडी पूल बंद करण्यात आल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने काही रस्त्यांवर वन वे केले आहेत.

हे रस्ते वाहतुकीसाठी बंद




इमामवाडा कॉसमॉस बँके समोरील रोड येथे रिक्षा, प्रवासी वाहतूक वाहने, चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

दगडी पूलाकडून जळगाव रोडकडे जाणारी वाहने रिक्षा, चार चाकी वगैरे वाहने मामाजी टाकीज रोडने जातील. सदर रोड वन वे असणार आहे

जळगाव रोड कडून दगडी पूलाकडे जाणारी वाहने रिक्षा चार चाकी वगैरे गवळी वाडा, नाटकर चौक या मार्गाने जातील. सदर रोड वन वे असणार आहे.

शहरातील वाहन धारकांनी सूचनांचे पालन करावे अन्यथा वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !