नराधम शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
A male teacher sexually assaulted a minor student. अहिल्यानगर (7 ऑगस्ट 2025) : जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील तिसरीत शिकणार्या अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. पाथर्डी पोलिस ठाण्यात 5 जणांविरोधात पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी शिक्षक हा पसार असून चौघे पोलिसांच्या ताब्यात आहेहत.
काय घडले नेमके
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पीडित मुलीवर शाळेच्या परिसरातच जबरदस्ती करण्यात आली. संबंधित मुलीला दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्यावेळी संजय फुंदे हा नराधम शिक्षक वर्गात बोलावून घेत तसेच तिच्यावर अत्याचार करत होता. या घडलेल्या प्रकारासंदर्भात मुलीने आपल्या आईला कल्पना दिली, त्यानंतर तिचे आई आणि वडील हे जाब विचारण्यासाठी शाळेत गेले असता त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.





