भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयाला समाजसेवक गिरीश महाजन यांची भेट
हॉस्पीटलमधील उपलब्ध सुविधांची जाणली माहिती : डॉ.सांतनू कुमार साहू यांनी केले स्वागत
Social worker Girish Mahajan visits Golden Hour Hospital in Bhusawal भुसावळ (8 ऑगस्ट 2025) : ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून शहरात आनंद नगरात डॉ.सांतनू कुमार साहू यांनी सुरू केलेल्या ‘गोल्डन अवर हॉस्पिटल’ ला भुसावळातील समाजसेवक गिरीश महाजन यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.सांतनू कुमार साहू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
सुविधांची जाणली माहिती
यावेळी समाजसेवक गिरीश महाजन यांना रुग्णालयातील विविधांगी सुविधांची माहिती डॉ.साहू यांनी दिली. शहरातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये केवळ भुसावळ शहरच नव्हे तर भुसावळ विभागातील यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील बहुतांशी गावांसह तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांसह मध्यप्रदेश सीमेतील बर्हाणपूर भागातील सुमारे 15 हजारांवर रुग्ण शर्थीच्या उपचाराअंती उपचार घेवून घरी गेल्याचे डॉ.साहू यांनी सांगितले.

चार हजारांवर रुग्णांवर शस्त्रक्रिया
प्रत्येक आपत्कालीन स्थितीत भुसावळसह जिल्हाभरातील रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर हॉस्पिटल’ हे खरोखरच गोल्डन अवर ठरत आहे. वैद्यकीय सेवेच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात 15 हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी व यशस्वी उपचारासह 15 हजारांवर क्रिटिकल स्थितीतील रुग्णांवर उपचार तर चार हजार रुग्णांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे डॉ.सांतनू कुमार साहू यांनी यावेळी सांगितले.
भुसावळातील हॉस्पीटलचा असा आहे पत्ता
ज्ञानरंजन टॉवर, सुराणा बिल्डींगजवळ, आनंद नगर, जामनेर रोड, भुसावळ, जि.जळगाव संपर्क- 7773944435




