भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात


भुसावळ (8 ऑगस्ट 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शुक्रवार, 8 रोजी ‘रक्षाबंधन’ आणि ‘संस्कृत दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.

बहिण भावाचे नाते द़ृढ करणारा रक्षाबंधन हा सण शाळेत अत्यंत उत्साहाने विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी यावेळी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या.


शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्व सांगितले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेत राखी बनविणे ही स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभाग घेवून आपले कलागुण दाखविले.

संस्थेचे संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑननरी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.

यावेळी शाळेमध्ये संस्कृत दिन साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरस सुबोधा हे गीत सादर केले. संस्कृत शिक्षिका तनुजा चौधरी यांनी संस्कृत भाषा काळाची गरज या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला इंग्लिश मिडीयम स्कुलमधील मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !