‘नवरत्न सेवा समर्पण सेवा गौरव पुरस्कार प्राप्त’ प्राचार्य अनघा पाटील यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून सत्कार
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या सहाव्या वर्धापनदिनी प्राचार्यांचा सन्मान
भुसावळ (8 ऑगस्ट 2025) : ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीद घेवून उत्तर महाराष्ट्रात कार्यरत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवार, 2 ऑगस्ट रोजी शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉनमध्ये झाला. या सोहळ्यात शहरातील विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्या नवरत्नांना नवरत्न सेवा समर्पण सेवा गौरव पुरस्काराने मान्यवरांनी गौरवले. या सोहळ्यात भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील यांचाही समावेश असल्याने त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून सत्कार करण्यात आला.
यांची सोहळ्याला उपस्थिती
वर्धापनदिन सोहळ्यासह प्रामुख्याने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गौरव प्रसंगी यांची होती उपस्थिती
प्राचार्यांचा गौरव करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, शिवाजी रोकडे, विजय जाधव, विनोद सोनवणे, नवनीत लोहार, प्रमोद पाटील, भानू भाऊ इत्यादी उपस्थित होते.




