भुसावळात ताप्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिलिटरी जवानांना बांधल्या राख्या


Students of Tapti School in Bhusawal tied rakhis to military personnel भुसावळ (8 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनींनी शहरातील मिलिटरी कॅम्पमध्ये जाऊन तेथील जवानांना राखी बांधून औक्षण केले. यावेळी भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्येही सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून औक्षण करीत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या उपक्रमानंतर शाळेत येऊन शिक्षकेतर कर्मचारी व शाळेत ने आण करणार्‍या सर्व वाहन-चालकांना राखी बांधून औक्षण केले. यावेळी प्रिंसीपल निना कटलर, व्हॉईस प्रिंसीपल श्रद्दाली घुले, मनप्रीत कौर, हर्षला चौधरी व शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !