आमदार खडसेंच्या विधानाचा निषेध : मुक्ताईनगरात छायाचित्राला मारले जोडे
Protest against MLA Khadse’s statement : Couple beats up a photographer in Muktainagar मुक्ताईनगर (11 ऑगस्ट 2025) : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विषयी आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतर्फे मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकात शुक्रवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली. एकनाथ खडसे यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
मुक्ताईनगरात यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगरात आंदोलनावेळी भाजपचे नेते, राष्ट्रीय बेटी पढाव बेटी बचावचे डॉ.राजेंद्र फडके, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील आदींची उपस्थिती होती.

बोदवडला यांची होती उपस्थिती
बोदवडला आमदार एकनाथ खडसे यांच्या भूमिकेचा महायुतीतर्फे निषेध करण्यात आला. आमदार खडसे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या छायाचित्रावर कचरा फेकण्यात आला. हे आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झाले.
आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय काकडे, तालुकाध्यक्ष निवृत्ती ढोले, शिवसेनेचे बोदवड तालुकाध्यक्ष प्रमोद धामोळे, शिवसेनेचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष नवनीत पाटील आदी सहभागी झाले.
पंकज राणे, भाजपचे तालुकाध्यक्ष जयपाल बोदडे, मोहन महाजन यांच्यासह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार एकनाथ खडसे यांच्या विधानाचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली.




