मुसळधार पाऊस होणार !  ‘या’ जिल्ह्यांसाठी वर्तवला अलर्ट


Heavy rains are expected! Alert issued for these districts मुंबई (28 ऑगस्ट 2025) : राज्याच्या हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. त्यात बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अलर्ट असून काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

असा आहे अलर्ट
हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास 40 ते 60 किमी वेगाने वाहणार असल्याचेही सांगण्यात आले आहेत. राज्यातील या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.




हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. आगामी तीन तासांत बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे , सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !