भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात हिंदी सप्ताह


Hindi Week at PU Nahata College, Bhusawal भुसावळ (16 सप्टेंबर 2025) : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे ’हिंदी सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. हिंदी सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील यांनी केले.

प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रा.डॉ.मनोज पाटील यांनी केले. हिंदी सप्ताह अंतर्गत कथोपकथन, काव्यवाचन, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन आदी कार्यक्रम घेण्याबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील म्हणाले की, हिंदी भाषा सर्वांना समजणारी भाषा आहे. संपूर्ण भारतात बोलली जाणारी ही भाषा आहे.


सामान्य व्यक्तीच्या संवेदना, भाव भाषेद्वारे व्यक्त होतात. भाषाही अर्जित संपत्ती आहे. कबीरदास, तुलसीदास, सूरदास, प्रेमचंद, दिनकर यांच्या माध्यमातून अहिंदी भाषेचा व्यक्ति ही हिंदी भाषेविषयी आवड निर्माण होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजेंद्र तायडे यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !