विद्यार्थिनींनी आरोग्यदायी सवयी अंगीकारून समाजात सकारात्मक बदल घडवावा : प्राचार्य आर.पी.फालक

भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोंळे महाविद्यालयात युवती सभेच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यक्रम


Students should adopt healthy habits and create positive change in society : Principal R.P. Falak भुसावळ (16 सप्टेंबर 2025) : विद्यार्थिनींनी आरोग्यदायी सवयी अंगीकारून समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी केले. भोळे महाविद्यालयात युवतीसाठी चालवल्या जाणार्‍या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. उद्घाटन भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ.प्रिया बर्‍हाटे (भोळे) यांनी केले.


डॉ.प्रिया बर्‍हाटे (भोळे) यांनी विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी ताण-तणाव व्यवस्थापन, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आवश्यक बाबींवर भाष्य केले.

सोशल मीडियाचा योग्य वापर व त्याचे फायदे व तोटे यावरही त्यांनी विद्यार्थिनींना जागरूक केले. डॉ.बर्‍हाटे यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने व मर्यादेत वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालयीन अभ्यासक्रमा सोबतच आपले व्यक्तिमत्व विकसीत करावे व भविष्यात काय करायचे याचे ध्येय ठरवावे असे मार्गदर्शन केले

प्रास्ताविक युवती सभेच्या सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी केले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.संजय डी.चौधरी, डॉ.अंजली पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ. आर.बी.ढाके, प्रा.एन.एस.वानखेडे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी तर आभार प्रा.डॉ.जे.पी.सरोदे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !