भुसावळातील डॉ.प्राजक्ता जोशी एम.डी.एस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण


भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : डॉ. प्राजक्ता जोशी यांनी नागपूर येथील डॉ.काळमेघ डेंटल महाविद्यालय येथून मास्टर इन डेंटल सर्जरी, अर्थोडॉन्टिक्स या विषयातून स्नातकोत्तर पदवी प्रथम श्रेणीतून प्राप्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या परीक्षेत प्राविण्यासह ही पदवी मिळवली आहे. यापुढे दंत चिकित्सा सेवा करण्याचा तिचा मानस आहे. ती प्राचार्य डॉ. रमेश जोशी व मुख्याध्यापिका सुनीता जोशी यांची सुकन्या आहे. तिला मार्गदर्शक डॉ. स्मिता यांचे बहुमोल मार्गदर्शन प्राप्त झाले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !