दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भारतीय संविधान दिन
भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत संविधान दिवस साजरा करण्यात आला.
प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी संविधान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगून संविधानाच्या मूल्यांची जाण, हक्क – कर्तव्याची जागरूकता आणि लोकशाहीची जपणूकबद्दल माहिती दिली. प्रसंगी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रीतपणे संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.



