यावल शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा


यावल (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : शहरातील बुरुज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

महामानवाच्या प्रतिमेचे पूजन
यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गावर बुरुज चौक आहे. या चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर एका कार्यक्रमाचे आयोजन करीत धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगरसेविका शालूबाई भालेराव यांच्या हस्ते पुष्प अपर्ण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी यावेळी नगरपालिकेचे माजी नगरसेवक समीर खान, मझरोद्दीन शेख, गुलाम रसूल शेख, इमरान पहेलवान, अ‍ॅड.सागर गजरेसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी रॉकी गजरे याने बुद्ध वंदना सामूहिकरीत्या या ठिकाणी घेतली व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. विशाल गजरे, सलमान शेख, अरुण तायडे, कैलास मेढे, भरत भालेराव, मनोज गजरे, मिथुन तायडे, शुभम गजरे, कल्लू खान आदींनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !