भुसावळातील हिंदी महाविद्यालयात संविधान गौरव दिवस साजरा
भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 रोजी एनएसएस व सांस्कृतिक विभागातर्फे संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ.रमेश जोशी होते.
एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाविषयी सविस्तर माहिती सांगितली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील योगदान व मौलिक अधिकार याविषयी माहिती सांगितली. महाविद्यालयीन प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी संविधानाचे चार स्तंभ स्वतंत्रता, समता, बंधूता, व सामाजिक न्याय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




सर्वांनी लोकतंत्र्याच्या नियमांचे पालन करावे व आपले आचरण चांगले ठेवावे, असे आवाहन केले. एनएसएस अधिकारी डॉ. विवेक जोशी यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. आभार प्रा.अनुपम शर्मा यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. कार्यक्रमात निवडणूक अधिकारी प्राध्यापक खरे यांनी एन.एस.एस. च्या स्वयंसेवक यांना कर्तव्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.