भुसावळ पालिका निवडणूक : 1400 कर्मचार्‍यांना 17 लाखांचे मानधन वाटप


Bhusawal Municipality Election: Honorarium of Rs. 17 lakhs distributed to 1400 employees भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : पालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पाडणार्‍या शहरातील 191 मतदान केंद्रावरील 1400 कर्मचार्‍यांना एकूण 17 लाख रुपयांचे मानधन वाटप करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतील विविध जबाबदार्‍या-मतदान केंद्र व्यवस्था, तांत्रिक कामे, सुरक्षा, साहित्य वितरण व परतावा-सुरळीत पार पाडल्याबद्दल या कर्मचार्‍यांना मानधन देण्यात आले आहे.

सुरळीत पार पडले मतदान
निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मतदान कर्मचार्‍यांनी मतदान केंद्रांवर जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. मतदान केंद्रांवरील कामकाज वेळेत सुरू व सुरळीत राहावे म्हणून अनेक कर्मचार्‍यांनी अतिरिक्त तासही काम केले. मानधन वितरणाची प्रक्रिया मंगळवारीच मतदान केंद्रांवर पार पडली. संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत कर्मचार्‍यांची नावे पडताळणी करून रक्कम वितरित करण्यात आली.



होमगार्ड बांधवांची मात्र नाराजी
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कर्मचार्‍यांचे कौतुक करताना सांगितले की, मतदान प्रक्रिया निर्विघ्न व शांततेत पार पडण्यात कर्मचार्‍यांचा मोठा वाटा आहे. मतदान केंद्रांवरील कर्मचार्‍यांच्या यादीनुसार त्यांना मानधन देण्यात आले. यामुळे मतदान प्रक्रियेतील कर्मचारी समाधानी दिसत होते मात्र अनेक होमगार्ड यांना कर्तव्यावर बोलावून सुध्दा त्यांना अपेक्षित मानधन मिळाले नाही. भुसावळातील भोळे महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रकाश सावळे यांनी तक्रार करतांना सांगितले की, यावल, रावेर येथे चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना तेथे जास्त रक्तम मिळाली, मात्र भुसावळ येथे फक्त 350 रुपये देण्यात आले. हा दुभाजाव कश्यासाठी, निवडणूकीचे नियम सर्वत्र सारखेच असतांना भुसावळ येथे मानधन देण्यात कर्मचार्‍यांवर अन्याय करण्यात आला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !