अनेक वर्ष सोबत राहिलेल्या प्रियकराचे लग्न ठरताच तृतीयपंथीयानं संपवलं जीवन ; प्रियकराला हळदीच्या मंडपातून उचलले
सोलापूर (6 डिसेंबर 2025) : अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतरही प्रेमपत धोका मिळाल्यानंतर प्रकाश व्यंकप्पा कोळी उर्फ स्वीटी (वय, 22) या तृतीयपंथीयाने गुरुवारी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वीटीचा प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार (23) याला पोलिसांनी हळदीच्या मंडपातून अटक केली.
लग्नाच्या निर्णयाने स्वीटी खचली
स्वीटी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेला सुजित जमादार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. दोघे काही महिने भाड्याच्या घरात एकत्र राहत होते, ज्याचे भाडे सुजितच भरायचा. मात्र, सुजितने अचानक दुसर्या डी-फार्मसीच्या तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वीटी मानसिकदृष्ट्या खचली आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यापूर्वी स्वीटीने रडत रडत एक व्हिडिओ बनवला आणि तो जवळच्या लोकांना पाठवला.









