लाखाची लाच भोवली : महिला मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात


पुणे (6 डिसेंबर 2025) : एक लाखांची लाच स्वीकारताच भोरमधील निगुडघर येथील महिला मंडलाधिकार्‍यास एसीबीने अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. रुपाली अरुण गायकवाड (40, रा. वेताळ पेठ, भोर, जि. पुणे) असे अटकेतील मंडळ अधिकार्‍याचे नाव आहे. माती वाहतुकीसाठी दीड लाखाची लाच मागून एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

असे आहे लाच प्रकरण
23 वर्षीय तक्रारदाराने भोर तहसील कार्यालयाकडून 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीसाठी 200 ब्रास माती वाहतुकीचा परवाना घेतला होता. त्यापोटी त्याने एक लाख 26 हजार 230 रुपये ‘रॉयल्टी’ भरली होती. परवाना मिळाल्यानंतर माती वाहतूक सुरू केली मात्र निगुडघर येथील मंडलाधिकारी रुपाली गायकवाड यांंनी 30 नोव्हेंबर रोजी माती वाहतूक करणार्‍या गाड्या अडविल्या. त्यांनी माती वाहतूक करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास माती वाहतूक करू दिली जाणार नाही, अशी धमकीही दिली.



त्यानंतर तक्रारदार तरुणाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपतच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी गुरुवारी दुपारी भोर परिसरातील अभिजीत मंगल कार्यालयाजवळ सापळा लावला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास गायकवाड यांना भोरेश्वरनगर रस्ता परिसरात तक्रारदाराकडून एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिमान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने केली. पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करीत आहेत.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !