भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम
भुसावळ (6 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात कवयित्री बहीणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
बहिणााईंचे काव्य अजरामर
बहिणाबाई चौधरी यांनी लिहलेल्या ओवी लेवागण बोली भाषेतून सादर केल्या आहेत. त्याविषयी उल्लेख करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पी फालक यांनी म्हटले की, बहिणाबाई यांनी अगदी बाल वयापासून ओवी गायन सुरूवात केली तर त्यांच्या लिखाणातून समाजाला खूप काही चांगले संदेश दिले गेले. तसेच त्यांच्या काव्यातून महाराष्ट्रातील बर्याच अभ्यासकांनी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. त्यांचे जीवन अगदी प्रतिकूल अश्या परिस्थितीतुन बहिण भावंडासोबत घालवले परंतू अशा परिस्थितीतदेखील त्यांनी ओवींच्या माध्यमातून समाजाला आदर्श असा पगडा निर्माण करुन दिला.




त्यांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी म्हणून त्यांनी लेवागण बोली भाषेतील काव्य हे इतर भाषेत रुपांतरीत करुन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपल्या क.ब.चौ.उ.म.वि जळगांव विद्यापीठाने संधी उपलब्ध करुन दिली. पून्नश्च बहिणाबाई चौधरी यांचे कार्य अविरत स्मरणात राहावं म्हणून महाराष्ट्र शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी असे नामकरण करुन काम असा आदर्श घडविला. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या तर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अंजली पाटील, रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी यांनी केले. यावेळी प्रा.संदीप साळुंखे (ऐनपूर), प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.गोविंदा वाघुळदे, प्रा.निर्मला वानखेडे, विजय पाटील , सुधाकर चौधरी, प्रकाश सावळे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.