भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात महामानव डॉ.आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन


भुसावळ (6 डिसेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शनिवार, 6 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी प्रतिमेचे पूजन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुणीका बेंडाळे, पार्थ चौधरी, श्वेता इंगळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महती वर्णन केली.विद्यालयातील उपशिक्षक नीळकंठ खाचणे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्यासंदर्भात विशेष माहिती कथन केली. विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.पी.पाठक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील व विभागातील कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !