भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भुसावळ (6 डिसेंबर 2025) : शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे होते. प्रमुख वक्ते प्रा.डॉ.पी.ए.अहिरे होते.




डॉ.पी.ए.अहिरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी असलेले योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. संविधानात नागरिकांसाठी मूलभूत हक्कांची उपाययोजना करण्यात आली आहे. ज्यामध्ये धर्मस्वातंत्र्य, अस्पृश्यता निवारण आणि जातीय भेदभावाला बंदी घालणे यांसारख्या तरतुदींचा समावेश आहे. एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे तत्त्व त्यांनी संविधानात रुजवले. संविधानात सर्व नागरिकांना कायद्यापुढे समान मानले गेले आणि स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले गेले, ज्यामुळे महिलांना उच्च पदांवर पोहोचणे शक्य झाले असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
यांची होती उपस्थिती
प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी बाबासाहेबांच्या एकंदरीत जीवनप्रवास वरती प्रकाश टाकला. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.विलास महिरे तर आभार प्रा.प्रशांत पाटील यांनी मानले. उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका स्वाती पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. के. राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता भिरुड, शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.