धार्मिक सहलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची मशिदीत भेट : सेंट अलॉयसीस शाळेच्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांविरोधात गुन्हा


Students visit mosque in the name of religious trip: Crime against eight people including the principal of St. Aloysius School भुसावळ (7 डिसेंबर 2025) : स्काऊट-गाईड उपक्रमांतर्गत शहरातील विविध प्रार्थनास्थळांना शहरातील सेंट अलॉयसीस शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली होती मात्र शहरातील जामा मशिदीत या विद्यार्थ्यांना नेल्यानंतर तिथे विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून प्रवेश देण्यात आला तसेच ‘ईस्लाम आंतक नव्हे आदर्श’ पुस्तक देण्यात आल्याने शहरातील हिंदूतत्वादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. दोषींवर कारवाईसाठी शहरातील हिंदूत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली व समितीच्या अहवालाअंती शाळेच्या मुख्याध्यापिकांसह आठ शिक्षकांवर शहर पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
गटशिक्षणाधिकारी किशोर नामदेव वायकोळे यांच्या फिर्यादीवरुन शाळेच्या मुख्यध्यापिका शिला, उपशिक्षक अमोल वांदळे, शेख इरफान, बर्नार्ड मॉरिस, उपशिक्षिका मिशेल फर्नांडिस, शिक्षण सेविका आफरीन खान, शिक्षणसेविका कौलीन कौर, खाजगी संगणक शिक्षक गुरजीतसिंग पदम यांच्याविरोधात बीएनएस कलम (2023) 299 व 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



काय आहे नेमके प्रकरण
भुसावळातील नामांकीत सेंट अलॉयसियस हायस्कूलतर्फे 11 सप्टेंबर 2025 रोजी इयत्ता नववीच्या स्काऊट्स अ‍ॅण्ड गाईड्स युनिटच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सद्भावना दिना’च्या निमित्ताने आयोजित ‘सर्वधर्म समभाव रॅली’दरम्यान विद्यार्थ्यांना शहरातील जामा मशीद, चर्च, गुरुद्वारा आणि मंदिरात नेण्यात आले होते. उपक्रमाच्या एक दिवस आधी विद्यार्थिनींना घरूनच स्कार्फ आणण्याचे शिक्षकांनी कळवले होते व विद्यार्थी शहरातील जामा मशिदीत गेल्यानंतर तेथे त्यांना ‘इस्लाम आतंक नव्हे आदर्श’ पुस्तक वाटप करण्यात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर शहरातील हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर त्यांनी विराट मोर्चा काढला होता.

त्रीस्तरीय समितीच्या अहवालाअंती कारवाई
हिंदूतत्वादी संघटनांनी काढलेला मोर्चा व तक्रार तसेच भाजपाचे राज्य परिषद सदस्य प्रमोद वामन सावकारे आदींनी केलेल्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी चौकशीसाठी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी व्ही.डी.सरोदे, जिल्हा स्काऊट व गाईड कार्यालयाच्या जिल्हा संघटक वैशाली महेशराव आवठळे व भुसावळ गटशिक्षणाधिकारी किशोर वायकाळे यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने 26 सप्टेंबर रोजी आपला निष्पक्ष अहवाल सादर केल्यानंतर 6 डिसेंबर रोजी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !