भुसावळातील धम्म नगरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भुसावळ (7 डिसेंबर 2025) : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शहरातील धम्म नगरात धम्म नगर मित्र परिवारातर्फे शनिवार, 6 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, समाजसेविका शोभा इंगळे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.



