धुळ्यात गुरुद्वारा प्रमुखावर हल्ला करणार्या आरोपीला बेड्या
Accused who attacked Gurudwara chief in Dhule arrested धुळे (8 डिसेंबर 2025) : धुळ्यातील गुरुद्वारा प्रमुखावर गुरुद्वारातच कामाला असलेल्या एकाने तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात संशयीतही जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र संशयीत बरा होताच त्यास पोलिसांनी अटक केली.
काय घडले धुळ्यात
धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग खालसा (62) यांच्यावर गुरुद्वारात कामाला असलेल्या उमेश माळोदे याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना 1 डिसेंबर रोजी सकाळी घडली होती. यावेळी संतप्त भाविकांनी उमेशला मारहाण केल्याने तो जखमी असल्याने त्याच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरू होते व हाता-पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर रविवारी त्याला डिस्जार्च मिळता एसआयटी पथकाने त्यास अटक केली.




यांनी केली कारवाई
एसआायटी प्रमुख पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, दीपक पाटील, निवृत्ती पवार, शिल्पा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.