भुसावळात कचरा व्यवस्थापन कोलमळले : सर्वदूर साचला कचरा


Waste management in Bhusawal has collapsed: Waste has piled up everywhere भुसावळ (10 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरात निवडणूकीच्या कामात व्यस्त असलेल्या पालिकेच्या यंत्रणेकडून कचरा संकलनाकडे दूर्लक्ष होत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कचरा व्यवस्थापन कोलमळले आहे. बर्‍याच भागात रस्त्यांवर कचरा साठला आहे. शहर कचराकुंडी मुक्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये मात्र कचरा रस्त्यावर साचत असल्याने अस्वच्छता वाढली आहे.

पालिकेच्या कारभाराचे वाभाडे
शहरात स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानातून स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार्‍या पालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाल्या आहेत. शहरातील विविध भागांमध्ये कचर्‍याचे ढिग साचले आहेत.



नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात गेल्या काही महिन्यांपासून कचर्‍याचे ढिग साचले आहेत. परिसरातील काही दुकानदार,विक्रेते या ठिकाणी कचरा टाकतात. पालिकेचे यावर कोणतेही नियंत्रण राहिले नाही. शहरातील मध्यवर्ती भागातील कोट्यवधी रुपयांची ही मालमत्तेवर कचर्‍याचा उकीरडा साचला आहे. यासोबतच शहरातील प्रमुख रस्ता, विस्तारीत भाग आदी ठिकाणीही साचलेल्या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.पालिकेच्या अनेक ओपन स्पेस कचर्‍याचे आगार बनल्या आहेत, मात्र त्यांची स्वच्छता होत नसल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !