!-- afp header code starts here -->

चोरीच्या दोन दुचाकींसह चोरटा मेहुणबारे पोलिसांच्या जाळ्यात


A thief, along with two stolen motorcycles, was caught in the net of Mehunbare police चाळीसगाव (20 जानेवारी 2026) : मेहुणबारे पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकींसह चोरट्याला अटक केली. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

दोन दुचाकीप्रकरणी दाखल होता गुन्हा
गुरुवार, 8 जानेवारी रोजी दरेगाव आणि वरखेड परिसरातून भरदिवसा दोन मोटारसायकल चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले.

तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी दादू संजय सोनवणे (19, रा.दरेगाव, ता.मालेगाव) याला मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील एक आणि इतर एक अशा एकूण दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. पकडण्यात आलेला आरोपी हा सराईत दुचाकी चोर असून त्याचे इतर दोन साथीदार सध्या पसार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून, त्यांच्या अटकेनंतर आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई प्रभारी अधिकारी एपीआय प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, हवालदार मोहन सोनवणे, गोकुळ सोनवणे, मिलिंद कुमावत, विनोद बेलदार, राकेश काळे, प्रशांत खैरे यांच्या पथकाने केली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !