जळगाव महापालिकेच्या गटनेतेपदी प्रकाश बालाणी
Prakash Balani appointed as the group leader of Jalgaon Municipal Corporation जळगाव (22 जानेवारी 2026) : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जळगावात भाजपा-महायुतीने घवघवीत यश मिळवले. भाजप 46 पैकी 46 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. एकीकडे भाजपला मोठे यश मिळाले तरी महापालिकेच्या गटनेतेपदी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले होते. अशातच बुधवारी भाजपने गटनेतेपदी प्रकाश बालाणी यांची निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गट महापालिकेतील कामकाज पुढे नेणार आहे.
असे आहेत भाजपाचे पदाधिकारी
उपगटनेतेपदी नितीन बरडे यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षांतर्गत समन्वय, सभागृहातील भूमिका तसेच निर्णय प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. प्रतोदपदी डॉ.चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली. सभागृहातील शिस्त, नियोजन आणि रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.




बुधवारी रात्री उशिरा भाजपच्या गट नोंदणीसाठी आयोजित बैठकीत गटनेत्याच्या नावाची घोषणा होऊ शकली नाही. गटनेता कोण? हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले.
अखेर भाजपकडून गटनेता, उपगटनेता जाहीर झाला. भाजपने महापालिकेच्या महापौर पदावर दावा केला असून महापौर पदाची खुर्ची कोणाला मिळणार ? हे महापौरपदाच्या आरक्षण सोडतीनंतरच जाहीर होणार असल्याने इच्छुक नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे.