29 महापालिकांसाठी आरक्षण जाहीर : जळगावात ओबीसी महिला तर धुळ्यात सर्वसाधारण आरक्षण


मुंबई (22 जानेवारी 2026) : राज्यभरातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी गुरुवार, 22 रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जळगाव महापालिकेसाठी ओबीसी महिला तर धुळ्यासाठी सर्वसाधारण (महिला)  आरक्षण निघाले आहे.

29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते.





15 महापालिकेवर असेल ‘महिलाराज’
50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, चार महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर नऊ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झाले तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण-
अनुसूचित जमाती- 1
अनुसूचित जाती- 3
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)- 8
सर्वसाधारण- 17

असे निघाले आरक्षण

छत्रपती संभाजीनगर- सर्वसाधारण
नवी मुंबई- सर्वसाधारण (महिला)
वसई-विरार- सर्वसाधारण
कल्याण-डोंबिवली- अनुसूचित जमाती
कोल्हापूर- ओबीसी
नागपूर- सर्वसाधारण (महिला)
बृहन्मुंबई- सर्वसाधारण (महिला)
सोलापूर- सर्वसाधारण
अमरावती- सर्वसाधारण
अकोला- ओबीसी (महिला)
नाशिक- सर्वसाधारण (महिला)
पिंपरी-चिंचवड- सर्वसाधारण
पुणे- सर्वसाधारण (महिला)
उल्हासनगर- ओबीसी
ठाणे- अनुसूचित जाती
चंद्रपूर- ओबीसी (महिला)
परभणी- सर्वसाधारण
लातूर- अनुसूचित जाती (महिला )
भिवंडी-निजामपूर- सर्वसाधारण
मालेगाव- सर्वसाधारण (महिला)
पनवेल- ओबीसी
मीरा-भाईंदर- सर्वसाधारण (महिला)
नांदेड-वाघाळा- सर्वसाधारण (महिला)
सांगली-मिरज-कुपवाड- सर्वसाधारण
जळगाव- ओबीसी (महिला)
अहिल्यानगर- ओबीसी (महिला)
धुळे- सर्वसाधारण (महिला)
जालना- अनसूचित जाती (महिला)
इचलकरंजी- ओबीसी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !